कुठे बसणार बंडखोरीचा फटका, कुठे होणार थेट लढत‌? पुणे जिल्ह्यातील 21 लढतींची माहिती, वाचा सविस्तर

213 0

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत आज म्हणजेच चार नोव्हेंबर रोजी संपली आहे. अनेक अपक्ष उमेदवारांनी आपल्यावरचा मागे घेतले आहेत तर काही बंडखोरांचा बंड शमवण्यात पक्षांना यश आलेलं आहे. आणि त्यानंतर आता महाराष्ट्रात सह पुण्यातीलही लढतींचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघांमध्ये कोणत्या उमेदवारांमध्ये थेट लढती होणार आहेत हे आता स्पष्ट झालं आहे.

पुणे शहरातील लढती

कसबा

1. रवींद्र धंगेकर,काँगेस
2. हेमंत रासने, भाजप
3. गणेश भोकरे, मनसे
4. कमल व्यवहारे, (काँग्रेस बंडखोर, स्वराज्य पक्षातून निवडणूक लढवणार)

कोथरूड

1. चंद्रकांतदादा पाटील, भाजप
2. चंद्रकांत मोकाटे, उबाठा शिवसेना
3. किशोर शिंदे, मनसे

छत्रपती शिवाजीनगर

1. सिद्धार्थ शिरोळे, भाजप
2. दत्ता बहिरट, काँग्रेस
3. मनिष आनंद, (काँग्रेस बंडखोर) अपक्ष निवडणूक लढवणार

खडकवासला

1. भीमराव तापकीर, भाजप
2. सचिन दोडके, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
3. मयुरेश वांजळे, मनसे

हडपसर

1. चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. प्रशांत जगताप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
3. साईनाथ बाबर, मनसे

वडगावशेरी

1. सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

कॅन्टोन्मेंट

1. आमदार सुनील कांबळे, भाजप
2. रमेश बागवे, काँग्रेस

पर्वती

1. माधुरी मिसाळ,भाजप
2. अश्विनी कदम, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
3. आबा बागुल, (काँग्रेस बंडखोर) अपक्ष निवडणूक लढवणार
4. सचिन तावरे, (बंडखोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
(महाविकास आघाडीच्या अश्विनी कदम यांना पाठिंबा जाहीर केला असून स्वतःचा प्रचार न करता अश्विनी कदम यांचा प्रचार करणार )

पुणे जिल्ह्यातील लढती

बारामती

1. अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. युगेंद्र पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
3. अभिजीत बिचुकले, अपक्ष

इंदापूर

1. हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
2. दत्ता भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
3. प्रवीण माने, अपक्ष (बंडखोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)

भोर वेल्हा मुळशी

1. संग्राम थोपटे, काँग्रेस
2. शंकर मांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
3. किरण दगडे पाटील, अपक्ष (बंडखोर भाजप)
4. कुलदीप कोंडे, अपक्ष (शिवसेना बंडखोर)

पुरंदर

1. संजय जगताप, काँग्रेस
2. विजय शिवतारे, शिवसेना
3. संभाजीराव झेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (मैत्रीपूर्ण लढत)

मावळ

1. सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. बापूसाहेब भेगडे, अपक्ष (बंडखोर भाजप)

जुन्नर

1. अतुल बेनके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
3. आशा बुचके, अपक्ष (बंडखोर भाजप)
4. शरद सोनवणे, अपक्ष (शिवसेना)

शिरूर हवेली

1. अशोक पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
2. माऊली कटके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

खेड आळंदी

1. दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. बाबाजी काळे, शिवसेना उबाठा

आंबेगाव

1. दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. देवदत्त निकम, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

दौंड

1. राहुल कुल, भाजप
2. रमेशआप्पा थोरात, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

पिंपरी

1. अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
2. सुलक्षणा शीलवंत,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

चिंचवड

1. शंकर जगताप, भाजप
2. राहुल कलाटे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

भोसरी

1. महेश लांडगे, भाजप
2. अजित गव्हाणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!