नागपूरमध्ये कुठे वाढलं तर कुठे घटलं मतदान ? पाहा सविस्तर टक्केवारी

103 0

लोकशाहीचा उत्सव म्हणजेच मतदान अखेर संपलेलं आहे. सकाळी सात वाजता सुरू झालेलं मतदान सायंकाळी सहा वाजता संपलेलं आहे. ज्या मतदान केंद्रांच्या बाहेर सहाच्या आधी आलेल्या मतदारांच्या रांगा आहेत, त्याच मतदान केंद्रांवर सहा नंतरही मतदान सुरू होतं. दरम्यान हाती आलेल्या आकडेवारीनुसार पाच वाजेपर्यंत राज्यात 58% मतदान झालेलं आहे. तर नागपूर मध्ये सरासरी 56.6% इतकं मतदान झालेलं आहे.

नागपूरमधील टक्केवारी

नागपूर मध्य 50.67%
नागपूर पूर्व 55. 98%
नागपूर उत्तर 51.70%
नागपूर दक्षिण 53.63%
नागपुर दक्षिण पश्चिम 51.54%
नागपूर पश्चिम 51.89%
हिंगणा 55.79%
कामठी 53.45%
काटोल 59.43%
रामटेक 65.59%
सावनेर 64.23%
उमरेड 67.37%

नागपूर जिल्ह्यातील मतदार संघ निहाय टक्केवारी वरील प्रमाणे असून सायंकाळी 5 वाजेपर्यंतची एकूण टक्केवारी ही 56.6% इतकी आहे.

Share This News
error: Content is protected !!