राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून सर्वच पक्ष मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळत आहेत. नुकतीच भाजपाकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे तर आज वंचित बहुजन आघाडीकडून 16 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आले आहे.
आजच्या 16 उमेदवारांसह वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत 83 उमेदवारांची घोषणा केली आहे.
आजच्या 16 जणांच्या यादीमध्ये मंगलदास निकाळजे यांना बारामतीतून उमेदवारी देण्यात आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात वंचितनं उमेदवार दिला आहे.