महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत महायुतीला 230 तर महाविकास आघाडीला 46 जागांवर यश मिळाला आहे. अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभवाचा सामना सहन करावा लागला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यशोमती ठाकूर ऋतुराज पाटील धीरज देशमुख अशा अनेक दिगजांना पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांना बंडावेळी साथ देणारे पाच आमदार ही पराभूत झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केलेल्या पहिल्याच विधानसभेतील भाषणात आपल्याला साथ दिलेल्या सर्व आमदारांना निवडून आणलं नाही तर राजकारणातून संन्यास घेऊन गावी शेती करायला जाईन असं म्हटलं होतं. मात्र आता शिंदेंच्या पाच आमदारांना पराभूत व्हावं लागलं आहे. शहाजीबापू पाटील यांना सांगोल्यात शेकापकडून पराभव स्वीकारावा लागला. भायखळ्यातून यामिनी जाधव पराभूत झाल्या. बुलढाण्यातून संजय रायमूलकर यांचा पराभव झाला. उमरग्यामध्ये ज्ञानराज चौगुले यांचा पराभव झाला.