सदा सरवणकर यांची माघार नाहीच; माहीममध्ये होणार तिरंगी लढत

191 0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलं असून 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात 288 विधानसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता.

त्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार दुपारी तीन वाजेपर्यंत 1,449 जणांनी माघार घेतली. 288 विधानसभा मतदार संघासाठी 10 हजार नऊशे इतके उमेदवारी अर्ज आले होते यापैकी 7,806 उमेदवारी अर्ज मंजूर झाले तर 1,645 उमेदवारी अर्ज नामंजूर झाले.

यामध्ये सर्वांचाच लक्ष लागलं होतं ते माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सरवणकर हे माघार घेतील का? याकडे. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत सदा सरवणकर यांनी माघार न घेतल्याने आता माहीम मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे.

माहीम विधानसभा मतदारसंघात राजपुत्र अमित राज ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदानंद उर्फ सदा सरवणकर यांना तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सदा सरवणकर हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील असं बोललं जात असतानाच त्यांनी आज वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी देखील ते भेट घेण्यासाठी गेले होते मात्र राज ठाकरे आणि सदा सरवणकर यांची भेट होऊ शकली नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!