eknath Shinde

विधानसभेत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली! ‘या’ चार अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा

215 0

नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या 288 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणुका पार पडल्या या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला महायुतीला 230 तर महाविकास आघाडीला 46 जागा मिळाल्या आहेत. पक्षनिहाय्य जागावाटपामध्ये भाजपा 133 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

त्याखालोखाल शिंदेंच्या शिवसेनेचे 57 अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 41 काँग्रेसचे 16 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 20 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दहा आमदार निवडून आले आहेत.

विधानसभा निवडणूकीचा निकाल लागू अवघा एक दिवस झाला असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. चार अपक्ष आमदारांनी शिंदेंच्या शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची विधिमंडळातील ताकद वाढले असून विधिमंडळातील संख्याबळ 57 वरून 61 वर गेलं आहे.


‘या’ अपक्ष आमदारांचा शिंदेंना पाठिंबा?

जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या शरद भिकाजी सोनवणे यांनी आपला पाठिंबा शिंदेंच्या शिवसेनेला जाहीर केला आहे. यासोबतच गंगाखेडच्या रत्नाकर गुट्टे शिरोळमधून निवडून आलेले राजेंद्र पाटील यड्रावकर आणि हातकणंगलेचे अशोक माने यांनी आपला पाठिंबा दिला आहे.


 

Share This News
error: Content is protected !!