काल मुख्यमंत्र्यांची गाडी अडवणारा, आज थेट मातोश्रीवर गेला; नेमकं काय आहे प्रकरण ?

3048 0

काल 11 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा संतोष कटके यांनी आडवला होता. त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनाच गाडीतून खाली उतरावं लागलं होतं. दरम्यान, आता हेच संतोष कटके थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. त्याचबरोबर संतोष कटके यांचे वडील साधू कटके हे आरपीआय पक्षाचे जिल्हाध्यक्ष असून आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

नेमकं काय घडलं ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल साकीनाका येथे एक जाहीर सभा झाली. ही सभा संपल्यानंतर मुख्यमंत्री तेथून निघाले. मात्र काही अंतरावरच शिंदे यांचा ताफा संतोष कटके यांनी अडवला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गाडीतून थेट खाली उतरावे लागले. या नंतर तात्काळ पोलिसांनी संतोष कटके यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना दंड भरायला लावून त्याला रात्रीच सोडून दिलं.

उद्धव ठाकरेंशी भेट

याच संतोष कटके यांनी आज थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकं काय घडलं हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी आठवले गटाचे एकनिष्ठ पदाधिकारी असलेले साधू कटके हे आता उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे प्राथमिक माहिती सूत्रांकडून हाती आली आहे.

Share This News
error: Content is protected !!