नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून 288 विधानसभा साठी झालेल्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना सहन करावा लागला यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही पराभवाला सामोरे जावे लागलं.
पहिल्यांदाच कराड दक्षिण मतदारसंघात अतुल भोसले यांच्या रूपानं भाजपाचं कमळ फुललं असून यामुळं 39, 355 मतांनी पृथ्वीराज चव्हाण यांना सामोरे जावं लागलं.
कोण आहेत अतुल भोसले?
उच्चविद्याविभूषित असणारे डॉ. अतुल भोसले यांच्याकडे भाजपाच्या प्रदेश चिटणीस पदाची जबाबदारी आहे
* भाजपाचे सांगली जिल्हा प्रभारी म्हणूनही डॉ. अतुल भोसले यांच्याकडे जबाबदारी आहे
* डॉ. अतुल भोसले हे श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष
* डॉ. अतुल भोसले हे सातारा जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य देखील आहे.
* 2019 ची विधानसभा निवडणूक डॉ. अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये लढवली होती त्यावेळी त्यांना 83,166 इतकी मतं मिळाली होती व ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते