शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; राहुल कुल यांच्याविरोधात रमेश थोरात यांना उमेदवारी

91 0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सात उमेदवारांची चौथी यादी प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये दौंड विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान आमदार आणि भाजपाकडून पुन्हा उमेदवारी मिळालेले राहुल कुल यांच्या विरोधात रमेश थोरात यांना उमेदवारी मिळाली आहे रमेश थोरात यांनी आजच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

यासोबतच खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र वैभव सदाशिवराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!