मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत असताना आता महायुतीच्या गोटातून मोठी बातमी समोर आली असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे
यामध्ये अनेक महत्त्वाच्या चेहऱ्यांचा समावेश असू शकतो असं राजकीय वर्तुळात सांगितलं जात आहे. नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचा दौरा करत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा अहवाल घेतला आहे.
पहिल्या यादीत कोणत्या प्रमुख नेत्यांना मिळू शकते उमेदवारी?
भाजपा
- नागपूर दक्षिण पश्चिम- देवेंद्र फडणवीस
- कामठी – चंद्रशेखर बावनकुळे
- शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
- चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
- जामनेर – गिरीश महाजन
- काटोल – आशिष देशमुख
- सिंदखेड राजा -जयकुमार रावल
- माण-खटाव – जयकुमार गोरे
- माळशिरस – राम सातपुते
- जिंतूर सेलू – मेघना बोर्डीकर
- चिखली- श्वेता महाले
शिवसेना
- कोपरी-पाचपाखाडी – एकनाथ शिंदे
- महाड – भरत गोगावले
- रत्नागिरी – उदय सामंत
- जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील
- दापोली – योगेश कदम
- नांदगाव – सुहास कांदे
- सांगोला – शहाजीबापू पाटील
- साक्री – मंजुळा गावित
राष्ट्रवादी
- बारामती – अजित पवार
- आंबेगाव – दिलीपराव वळसे पाटील
- येवला – छगन भुजबळ
- कागल – हसन मुश्रीफ
- रायगड – अदिती तटकरे
- परळी – धनंजय मुंडे
- जुन्नर – अतुल बेनके
- मावळ – सुनील शेळके
- अहेरी – धर्मरावबाबा आत्राम
- खेड – दिलीप मोहिते
- उदगीर – संजय बनसोड