राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर बैठकांवर बैठका होत असतानाच वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली असून आज 10 उमेदवारांची दुसरी यादी वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर करण्यात आली आहे.
राज्यात स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याचा नारा वंचित बहुजन आघाडीने दिल्यानंतर 20 सप्टेंबर रोजी रावेर मतदार संघातून शमीभा पाटील यांच्या उमेदवारीसह वंचित बहुजन आघाडीने 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज वंचित बहुजन आघाडीने दहा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून आज जाहीर केलेल्या सर्व दहा जागी वंचित बहुजन आघाडीकडून मुस्लिम उमेदवार देण्यात आले आहेत.