राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात 288 विधानसभा मतदार संघासठी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या अगोदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत अखेर विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांना पुन्हा एकदा शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
भायखळा विधानसभा मतदारसंघातून मनोज जामसुतकर वडाळा मतदारसंघातून श्रद्धा जाधव कल्याण पूर्व मतदारसंघातून धनंजय बोोडारे कणकवली मतदारसंघातून सिद्धेश पारकर तर देवळाली मतदारसंघातून योगेश घोलप यांना उमेदवारी देण्यात आले आहे.
नुकताच ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी आमदार अनिल गोटे यांना धुळे शहर मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे तर राजू तडवी यांना जळगाव शहरातून उमेदवारी देण्यात आली आहे जयश्री महाजन यांना बुलढाणा जयश्री शेळके यांना दिग्रज पवन जयस्वाल यांना हिंगोली तर रूपाली पाटील यांना परतूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
याबाबतची अधिकृत माहिती सामना वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली आहे.