कदमांचं बंड शमावण्यात पवारांना यश ! राजू खरेंच्या पारड्यात पडणार आणखी मतं ?

98 0

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोहोळ विधानसभेसाठी माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर पक्षातून होत असलेला विरोध गांभीर्याने घेऊन शरद पवारांनी उमेदवार बदलण्याचा निर्णय घेत राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यानंतर नाराज झालेल्या कदम पिता आणि कन्येनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र आता हा अर्ज मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गट आणि उमेदवार राजू खरे यांचं मोठं टेन्शन कमी झालं आहे.

मविआतून विरोध

इच्छुकांची गर्दी असतानाही मोहोळ मधून सिद्धी कदम यांना लहान वयात उमेदवारी देण्यात आल्याने स्थानिक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थाने जाऊन त्यांचे भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पवारांनी उमेदवार बदलण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र यामुळे माजी आमदार रमेश कदम नाराज झाले. सिद्धी कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. मात्र नुकत्याच झालेल्या पाडवा मेळाव्याच्या दिवशी रमेश कदम यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मोहोळ मध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेतला. आणि अखेर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर ते अधिकृत उमेदवाराचा प्रचार करताना देखील पाहायला मिळणार आहेत.

अर्ज मागे घेतल्यानंतर रमेश कदम म्हणाले, ‘ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माझ्या मुलीला लहान वयात संधी दिली, त्या पक्षाचा आदेश पाळला पाहिजे. राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात आपण अपक्ष अर्ज ठेवायचा नाही. हा विचार करून मी आणि माझ्या मुलीने विधानसभा निवडणुकीत माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.’

Share This News
error: Content is protected !!