आता एकच निर्धार विजयाचा, मायबाप जनतेच्या आशीर्वादाने निवडून येणार

159 0

पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्री आबा बागुल यांनी शेवटपर्यंत माघार घेतली नसून, आज माघारीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी, आता एकच निर्धार विजयाचा, मायबाप जनतेच्या आशीर्वादाने निवडून येणारच असा विश्वास व्यक्त केला आहे.

पुणे शहरातील काय पण पंचकृषीतील हजारो वृद्ध माता पित्यांना काशी यात्रा घडविणारा श्रावणबाळ म्हणून परिचित असलेल्या श्री बागुल यांना श्री काशीविश्वेश्वर आणि श्री लक्ष्मीमाता यांचे आशीर्वाद लाभला आहे. ‘आबा एक, पैलू अनेक’ हे वर्णन तंतोतंत लागू होणाऱ्या व कोहिनूर हिऱ्याप्रमाणे चमकणाऱ्या आबा बागुलांना या निवडणुकीत ‘हिरा’ हे चिन्ह मिळाले, हा दैवी शुभसंकेतच आहे.

आबा बागुल हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी पुणे महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते पद, गटनेते पद आदी महत्त्वाची पदे यशस्वीरित्या पार पाडली आहेत.

यामुळे आबा बागुल यांना उमेदवारी न दिल्याने, पर्वती मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह, नागरिकांनीही पर्वती मतदारसंघात सांगली पॅटर्न राबविण्याचा निर्धार केला असून त्यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. प्रारंभी पासून काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या बागुल यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला असला तरी, त्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात काँग्रेस भवन येथूनच केली. त्यांच्या या भूमिकेचे सर्वच स्थरातून स्वागत झाले.

Share This News
error: Content is protected !!