महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: रितेश आणि जिनिलिया देशमुख यांनी लातूरमध्ये बजावला मतदानाचा हक्क

133 0

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज, 20 नोव्हेंबर रोजी राज्यभर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेलं मतदान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. राज्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर आपल्या मतदानाचा हक्क बजावता दिसत आहे. सिनेसृष्टीतील कलाकारही यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहेत, आणि त्यांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी लातूरमधील बाभळगाव येथे मतदान केंद्रावर हजेरी लावत आपला हक्क बजावला. दोघांनीही सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभं राहून मतदान केलं. यावेळी त्यांनी प्रत्येक नागरिकाने मतदान करणं किती महत्त्वाचं आहे, याचा संदेश दिला.

लातूर विधानसभा मतदारसंघात रितेश देशमुख यांचे बंधू अमित देशमुख काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमित देशमुख यांच्या प्रचारासाठी रितेशने मोठी भूमिका बजावली होती. ठिकठिकाणी सभा घेत, त्यांनी आपल्या बंधूला जोरदार पाठिंबा दिला.

Share This News
error: Content is protected !!