राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत असताना आता काँग्रेस पक्षाची 16 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीत नांदेड दक्षिण मतदार संघातून मोहन हंबर्डे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून दिग्रस मतदार संघातून माजी मंत्री काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आले आहे.
देगलूर मतदारसंघातून निवृत्ती कांबळे यांना तर अंधेरी पूर्व मतदार संघातून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.