मनसेची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरेंसह पुण्यातील तीन मतदारसंघातून जाहीर केले उमेदवार

128 0

राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्वच पक्षात तयारी करत असताना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली

यामध्ये माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे वरळीतून संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळाली आहेत तर पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून किशोर शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना उमेदवारी मिळाली आहे. तर खडकवासला विधानसभा मतदारसंघातून मनसेचे सोनेरी आमदार स्व. रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश रमेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!