Modi And Rahul Gandhi

हरियाणात ‘खेला खोबे’: सुरुवातीला पिछाडीवर असलेली भाजप आघाडीवर तर काँग्रेस बॅकफूटवर

178 0

हरियाणा विधानसभा निवडणूक मतमोजणीत मोठा उलटफेर होणाची चिन्हं आहेत. हरियाणात मतमोजणीच्या टप्प्यात सुरुवातीला बॅकफूटला असणाऱ्या भाजपने जोरदार कमबॅक केले आहे.

 

 

सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या राऊंडपासून काँग्रेसने चांगलीच आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीनंतर काँग्रेस 51 जागांवर आघाडीवर होती. काँग्रेस बहुमताच्या पुढे गेल्याने काँग्रेस हरियाणात सत्ता स्थापन करेल असा कयास वर्तवला जात होता. तर या राऊंडमध्ये भाजप 31 जागांवर आघाडीवर होती. मात्र निकालात अचानक मोठा ट्विस्ट आला. भाजपने अनपेक्षितपणे दमदार कमबॅक करत 38 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने 31 जागांवर आघाडी घेतली आहे. अचानक झालेल्या या बदलामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही पक्षातील लढत रंगतदार होत आहे. त्यामुळे हरियाणाच्या लाल मातीच्या कुस्तीत कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Share This News
error: Content is protected !!