‘माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद, हे किरकोळ लोक माझं काय करणार?’; अब्दुल सत्तार रावसाहेब दानवेंवर कडाडले

198 0

महायुती आणि महाविकास आघाडीत वरवर सगळं सुरळीत वाटत असली तरीही दोन्हीकडे असे अनेक नेते आहेत त्यांचे पक्ष एकत्र आले असले तरीही त्यांचा आपापसात मात्र पटत नाही. आपापसातले मतभेद अजूनही दूर झालेले आहेत. अशाच दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. हे नेते आहेत भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे आणि मंत्री अब्दुल सत्तार.. नुकताच अब्दुल सत्तार यांनी प्रचार सभेत बोलताना रावसाहेब दानवे यांच्यावर अप्रत्यक्ष पण कडाडून टीका केली.

‘मला निवडणुकीत कुत्रा हे चिन्ह मिळालं तरीही मी निवडून येऊ शकतो’, असं विधान सिल्लोड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. याच पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी पुन्हा नुकत्याच झालेल्या प्रचार सभेत रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली.

‘राज्यात जे पाच मोठे नेते आहेत, त्यात माझं नाव आहे, यावरुनही काही जण माझा व्देष करतात. जर मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवू शकतो, तर हे किरकोळ लोक माझं काय करणार ?’, अशा थेट सवाल अब्दुल सत्तार यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर रावसाहेब दानवे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका देखील केली.

Share This News
error: Content is protected !!