Vinod Tawde

राज्यात महायुती किती जागांवर विजयी होणार? विनोद तावडे यांनी थेट आकडाच सांगितला

137 0

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचे पाच दिवस शिल्लक असताना महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे अशातच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत थेट तीनही पक्षांच्या विजयी जागांचा आकडाच सांगितला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला विनोद तावडे यांनी मुलाखत दिली त्यावेळी बोलताना विनोद तावडे यांनी भारतीय जनता पार्टी 95 ते 105 जागांवर विजयी होईल. शिवसेना 45 ते 55 तर अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 25 ते 30 जागांवर विजयी होईल असा विश्वास विनोद तावडेंनी व्यक्त केलाय.

यासोबतच महायुती म्हणून आम्ही 165 ते 170 जागा जिंकू असंही विनोद तावडे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये जनादेशाची गद्दारी केली.

महाराष्ट्रातील 2019 च्या सत्ता संघर्षावर विनोद तावडे यांनी भाष्य करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनीच जनादेशाची गद्दारी केली असं विनोद तावडे म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!