विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून उमरेड मतदारसंघातून सुधीर पारवे यांना तर मीरा-भाईंदर मतदारसंघातून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी मिळाली आहे.
मीरा-भाईंदरमधून गीता जैन या अपक्ष आमदार होत्या. मात्र त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळेल असं बोललं जात होतं. मात्र नरेंद्र मेहता यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे.