नंदुरबार: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात 288 विधानसभा मतदारसंघात निवडणूक होत असतानाच आता उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते विजयकुमार गावित यांच्या कन्या आणि नंदुरबार लोकसभेच्या माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे.
2014 आणि 2019 मध्ये हिना गावित या नंदुरबार लोकसभेतून विजयी झाल्या होत्या मात्र 2019 मध्ये काँग्रेसच्या के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांनी हिना गावित यांचा पराभव केला त्यानंतर त्या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून तयारी करत होत्या मात्र महायुतीमध्ये ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटली गेली आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून आमश्या पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली त्यानंतर हिना गावित यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
त्यानंतर आज हीना गावित यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याची घोषणा केल्यानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा फटका बसला आहे