Uddhav Thackeray

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदे विरोधात केदार दिघेंना उमेदवारी

86 0

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली 65 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये उन्मेश पाटील यांना चाळीसगाव विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार तिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर किशोर पाटील यांच्या विरोधात त्यांच्याच भगिनी वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राजन विचारे यांना ठाणे विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि विक्रोळी विधानसभेचे विद्यमान आमदार सुनील राऊत यांना पुन्हा एकदा विक्रोळी विधानसभेतून संधी देण्यात आली आहे तर काही दिवसांपूर्वीच भाजपा मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक एकनाथ पवार यांना लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

यासोबतच वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांचे मामेभाऊ वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे

Share This News
error: Content is protected !!