अखेर राजेंद्र शिंगणे यांनी तुतारी फुंकलीच; शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश

181 0

राज्यात विधानसभा निवडणूक घोषणा झाले असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय कृषी व संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे चांगलेच ॲक्शन मोडवर आल्याचा पाहायला मिळत असून मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात अनेक बड्या नेत्यांचा प्रवेश होताना पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या कागल चे युवा नेते समरजीत सिंह राजे घाडगे, माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.

त्यानंतर आज माजी मंत्री आणि सिंदखेड राजाचे आमदार डॉ. राजेंद्र भास्कर शिंगणे यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

राजेंद्र शिंगणे हे 1999, 2004, 2009, 2014, 2019 या मागील पाच निवडणुकांमध्ये सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून निवडून येत असून 2019 ते 2022 या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे.

Share This News
error: Content is protected !!