रावसाहेब दानवे यांनी खरंच लाथ मारली का? त्या कार्यकर्त्यांनंच दिलं स्पष्टीकरण

89 0

आपल्या गावठी शैलीत मिश्किल टोलेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री भाजप नेते रावसाहेब दानवे एका नव्या वादात अडकले आहेत. दानवे आपल्या कार्यकर्त्याला लाथ मारत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आपल्या गावठी शैलीत मिश्किल टोलेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री भाजप नेते रावसाहेब दानवे एका नव्या वादात अडकले आहेत. दानवे आपल्या कार्यकर्त्याला लाथ मारत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे

महाविकास आघाडीने रावसाहेब दानवे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता ज्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवे यांनी लाथ मारली, ते शेख हमद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रावसाहेब दानवे आणि माझी 30 वर्षांपासूनची मैत्री आहे. त्यांचा शर्ट अडकल्याचे मी तो व्यवस्थित करण्यासाठी पुढे गेलो होतो. पण त्यांना ते नीट न समजल्याने आणि त्यांच्या हातात पुष्पगुच्छ असल्याने त्यांनी मला मिश्किलपणे बाजूला सारले, असे शेख हमद म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!