Sharad-Pawar-vs-Ajit-Pawar

निवडणूक विधानसभेची आढावा मतदारसंघाचा: ‘या’ मतदारसंघात होणार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत

95 0

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून महाराष्ट्रात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान बहुतांश सर्व पक्षांनी आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून अनेक विधानसभा मतदारसंघातत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे.

नुकतीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 45 उमेदवारांची पहिली यादी आल्यानंतर आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुन्हा सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यातील बारामती शिरूर कागल या प्रमुख मतदार संघांसह अन्य अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे.

राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत होणारे मतदार संघ कोणते?

बारामती: बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे या मतदारसंघात हाय व्होल्टेज लढतीसह दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने असणार आहेत

आंबेगाव विधानसभा: आंबेगाव विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी दिली आहेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली आहे

इस्लामपूर वाळवा विधानसभा मतदारसंघ: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपातून आलेल्या निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

शिरूर: शिरूर विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विद्यमान आमदार ॲड. अशोक पवार यांना उमेदवारी दिली आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून प्रवेश केलेल्या माऊली कटके यांना उमेदवारी दिली आहे.

वडगावशेरी: वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी आमदार बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी दिली आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनं विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिली आहे

कागल विधानसभा: कागल विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विद्यमान आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना पुन्हा संधी दिली आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भाजपातून आलेल्या समरजीत सिंह राजे घाडगे यांना उमेदवारी दिली आहे

कळवा मुंब्रा विधानसभा: कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी दिलेली आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नजीम मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे.

हडपसर विधानसभा: हडपसर विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विद्यमान आमदार चेतन तुपे पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पुणे शहराध्यक्ष प्रशांत सुदामराव जगताप यांना उमेदवारी दिली आहे.

इंदापूर विधानसभा: इंदापूर विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांना उमेदवारी दिली आहेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपातून आलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

अहेरी विधानसभा: अहेरी विधानसभा मतदारसंघातून मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना उमेदवारी दिली आहेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनं त्यांच्याच कन्या भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी दिली आहे

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ: तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित आर आर पाटील यांना उमेदवारी दिली आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

एकंदरीतच आता या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणाऱ्या या लढतीत काका पुतण्यावर मात करणार की पुतण्या वरचढ ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे…

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!