वंचितकडून लोकसभा लढवणारे हवामान अभ्यासक पंजाबराव डख करणार भाजपच्या ‘या’ उमेदवाराचा प्रचार

147 0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या प्रचारांनी वेग पकडला असताना आता राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली असून वंचित कडून परभणी लोकसभा लढवणारे हवामान अभ्यासक पंजाबराव डख विधानसभेला मात्र भाजपाचा प्रचार करताना दिसणार आहेत.

भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते पंजाबराव डख यांनी भाजपात प्रवेश करुन कमळाचा गमछा गळ्यात घातला. हवामान तज्ञ अशी ओळख असलेल्या पंजाबराव डख यांच्या भाजप प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पंजाबराव डख यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला असून भाजपच्या विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासाठी ते प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!