चिंचवड विधानसभा निवडणूक तिरंगी होणार? पक्षांतर्गत इच्छुकांचा फटका नेमका कोणाला बसणार? पाहा चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नेमकी गणित कशी?

196 0

महाराष्ट्रतील विधानसभेतील जवळपास सर्वच लढती स्पष्ट झाल्या असून,चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून शंकर जगताप तर शरद पवार गटाकडून नाना काटे हे इच्छुक असताना त्यांच्या जागी राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळाल्याने नाना काटे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे त्यामुळे चिंचवड मधील लढत ही तिरंगी पाहायला मिळणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची घोषणाही केली. महाराष्ट्रातील चर्चेतला असणारा मतदारसंघ म्हणजे चिंचवड विधानसभा मतदारसंघ. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लक्ष्मण जगताप यांनी निवडणूक लढवली. निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचा धक्कादायक पराभव केला. लक्ष्मण जगताप यांना 78741 मतं मिळाली तर श्रीरंग बारणे यांना 72166 मतं मिळाली. तर लक्ष्मण जगताप यांनी श्रीरंग बारणेचां 6575 मतांनी पराभव केला. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रवेश करत विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना 123786 मतं मिळाली. तर शिवसेनेचे उमेदवार राहुल कलाटे यांना 63489 मत मिळाली. लक्ष्मण जगताप यांनी राहुल कलाटे यांचा 60297 मतांनी पराभव केला. 2019 ची निवडणूक भाजपाचे उमेदवार लक्ष्मण जगताप विरुद्ध अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी झाली या लढतीत लक्ष्मण जगताप यांनी राहुल कलाटे यांचा 38 498 मतांनी पराभव केला. त्यानंतर लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगानं निधन झालं. आणि त्यानंतर झालेल्या चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव करत आमदार म्हणून विजयी झाल्या. 2024 च्या निवडणुकीत भाजपाने अश्विनी जगताप यांच्यावरती त्यांचे दीर शंकर जगताप यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे भाजपचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे व चंद्रकांत नखाते यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु पक्षाने अखेर शंकर जगताप यांना उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राहुल कलाटे आणि नाना काटे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते.  शरद पवार गटाकडून अखेर राहुल कलाटे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून शंकर जगताप तर शरद पवार गटाकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आल्याने आता नाना काटे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपा कडून शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आल्याने माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, चंद्रशेखर नखाते हे नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आल्याने नाना काटे नाराज आहेत. आणि अशातच चिंचवड विधानसभा मतदारसंघातून नाना काटे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहेत. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक नेहमीप्रमाणे जातात तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपा आणि शरद पवार गटातील इच्छुकांची नाराजी दोन्ही पक्षांना भोवणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!