बारामती विधानसभा मतदारसंघातील दोन मतदान केंद्रात बदल

191 0

पुणे:  निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बारामती विधानसभा मतदार संघातील 2 मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला असून त्या भागातील नागरिकांनी बदललेल्या ठिकाणाची नोंद घेवून मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.

या बदलानुसार विधानसभा मतदारसंघातील पूर्वीचे मतदान केंद्र क्र. 142 बारामती नगरपरिषद राममंदीर बालवाडी पश्चिममुखी खोली क्र.१ ऐवजी शारदा प्रांगण शाळा क्र.५ पश्चिममुखी खोली क्र. २ तसेच मतदान केंद्र क्र. १७५ बारामती नगरपरिषद राहूल बालवाडी दक्षिणमुखी खोली क्र.१ ऐवजी बारामती नगरपरिषद अनंतनगर सामाजिक सभागृह असे मतदान केंद्रात बदल करण्यात आला आहे, अशी माहिती नावडकर यांनी दिली आहे

Share This News
error: Content is protected !!