राज्यात विधानसभा निवडणुकांचे घोषणा झाली असून सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत असताना भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह प्रमुख पक्षांनी आपले उमेदवारही जाहीर केले आहेत.
यामध्ये बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळणार असून आता मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातही काका विरुद्ध पुतणी अशी लढत पाहायला मिळणार आहे.
नुकतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून घरवापसी केलेल्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरुवातीपासून असणाऱ्या राजेंद्र शिंगणे यांच्या पुतणी जिल्हा कार्याध्यक्ष गायत्री शिंगणे या विधानसभेची तयारी करत होत्या मात्र राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिल्यानंतर त्या काहीशा नाराज असून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. सध्याची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती सर्व पक्षांची व व्यक्तींची सारखी झालेली आहे. सर्व आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपड करत आहेत यात आम्ही सुद्धा आमचे अस्तित्व टिकवण्यासाठी मागें राहणार नाही आहोत पूर्ण ताकदीनिशी निवडणूकीला सामोरे जाऊ असं म्हणत गायत्री यांनी विधानसभा निवडणुकीचे दंड थोपटले आहेत