पुण्याच्या शिवाजीनगर मधून भाजपाचे सिद्धार्थ शिरोळे विजयी

98 0

2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पुणे येथील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी 36,702 मतांनी विजय मिळवला. हे त्यांचे सलग दुसरे विजय असून, त्यांना 20219मध्ये 2800मतांनी जिंकता आले होते.

यंदा भाजपने महायुतीकडून सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांना बंडखोरीला सामोरे जावे लागले. दत्ता बहिरट यांनी काँग्रेसचे तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष केला, पण शिरोळे यांचा विजय निश्चित ठरला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरोळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला.

शिरोळे यांना 84,695 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांना 47,993 मते प्राप्त झाली. मनीष आनंद यांनी 13,061मते घेतली.

Share This News
error: Content is protected !!