राज्यात अवघ्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाचणार आहे सर्वच पक्ष मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी करत असताना पाहायला मिळत आहे महाराष्ट्र मध्ये विधानसभेचे एकूण 288 विधानसभा मतदारसंघ असून या 288 मतदारसंघांमध्ये सद्यस्थिती काय आहे कोणत्या पक्षांचे आमदार आहेत मागील निवडणुकांमध्ये या मतदार संघातील गणित नेमकी कशी राहिली होती यावरचा आढावा घेणारा टॉप न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम चर्चा विधानसभेची आढावा मतदार संघाचा.
चर्चा विधानसभेचे आढावा मतदार संघाचा या विशेष कार्यक्रमांमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत राज्यातील दुसरा मतदारसंघ शहादा विधानसभा मतदारसंघाबद्दल या मतदारसंघात भाजपाचे राजेश पाडवी हे विद्यमान आमदार आहेत 2009 14 आणि 2019 च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील लढती कशा झाल्या होत्या आणि कोणाचा विजय झाला होता पाहूया
2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे पद्माकर वळवी शिवसेनेचे उदयसिंग पाडवी अपक्ष लालसिंग वळवी आणि मास्कवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोहनसिंग शेवाळे अशी लढत झाली होती.
या निवडणुकीत काँग्रेसचे पद्माकर वळवी 51,222 मतं मिळवत विजयी झाले होते
शिवसेनेचे उदयसिंह पाडवी यांना 38,635 मतं मिळाली होती
अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असणारे लालसिंग वळवी यांना 29,656 इतकी मतं मिळाली होती
तर मास्कवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोहनसिंग शेवाळे यांना अवघी 8,274 इतकी मते मिळाली होती
__________________________________________
2014 ला युती आघाडी तुटल्यानंतर भाजपाचे उदयसिंग पाडवी, काँग्रेसचे पद्माकर वळवी, राष्ट्रवादीकडून राजेंद्रकुमार गावित, शिवसेनेचे सुरेश नाईक यांच्यामध्ये लढत झाली होती.
या निवडणुकीत भाजपाचे उदयसिंग पाडवी हे 58,556 मतं घेत विजयी झाले होते.
काँग्रेसच्या पद्माकर वळवी यांना 57,837 इतकी मतं मिळाली होती
राष्ट्रवादीच्या राजेंद्रकुमार गावित यांना 46,966 इतकी मतं मिळाली होती
तर शिवसेनेच्या सुरेश नाईक यांना अवघी 6,645 इतकी मतं मिळाली होती.
__________________________________________
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे राजेश उदयसिंग पाडवी विरुद्ध काँग्रेसचे पद्माकर वळवी अशी लढत झाली होती.
या निवडणुकीत भाजपाचे राजेश पाडवी यांना 94,931 इतकी मतं मिळाली होती
काँग्रेसच्या पद्माकर वळवी यांना 86,940 इतकी मत मिळाली होती
__________________________________________