शरद पवारांना मोठा धक्का ! मोठ्या नेत्याने सोडचिठ्ठी देत धरली अजित पवार गटाची वाट

100 0

विधानसभेचे बिगुल वाजल्यापासून दररोज पक्षांतराच्या बातम्या येत आहेत. अशीच एक मोठी बातमी आली असून यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. कारण शरद पवार यांच्या विश्वासू नेत्याने त्यांची साथ सोडत अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

शरद पवार हे रविवारी इंदापूर दौऱ्यावर होते. त्यांचा हा दौरा संपताच राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्याने अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज असलेले इंदापूर मतदारसंघातील आप्पासाहेब जगदाळे यांनी शरद पवारांना सोडचिट्टी देत अजित पवारांची वाट धरली आहे.

जगदाळे होते नाराज

इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली. या ठिकाणी आप्पासाहेब जगदाळे देखील इच्छुक होते. मात्र पुन्हा हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्याने नाराज असलेल्या जगदाळे यांनी जनतेसमोर खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला साथ देणार नाही असं म्हणत हर्षवर्धन पाटलांवर टीका केली होती. त्यानंतर अखेर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याबरोबरच ते अजित पवार गटात लवकरच प्रवेश देखील करणार आहेत.‌ जगदाळे हे दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारात देखील दिसणार असल्याने शरद पवार गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!