सोलापूर जिल्ह्यातील सायंकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल 57.9% इतकं मतदान झालं आहे. मतदान संपण्यासाठी एक तास बाकी असताना हाती आलेली ही आकडेवारी असून यामध्ये एकूण मतदारांपैकी 11 लाख 20 हजार 906 सहा पुरुषांनी मतदान केलं असून 18 लाख 66 हजार 265 महिलांनी मतदान केलं आहे. तर 69 तृतीयपंथी मतदारांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
राज्यात मतदानाची प्रक्रिया ही सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पार पाडली जाणार होती. त्या अनुषंगाने ठराविक काळानंतर मतदानाची टक्केवारी समोर येत होती. दरम्यान अनेक मतदान केंद्र ही सायंकाळी सहा वाजता बंद करण्यात आली. त्याच्या केंद्रांवर सहा वाजण्याच्या आधी मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत त्या सर्व मतदारांचं मतदान पूर्ण होईल पर्यंत मतदान केंद्र चालू राहणार आहेत.
एकूण मतदान किती?
सोलापुरातील 11 विधानसभा मतदारसंघांपैकी बार्शी, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, शहर मध्य, पंढरपूर, अक्कलकोट व सांगोला या ठिकाणी सर्वच नागरिकांनी अगदी उत्साहात मतदान केलं आहे. मात्र, जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील 38 लाख 48 हजार 869 मतदारांपैकी 16 लाख 51 हजार 633 मतदारांनी मतदानाचा सायंकाळी पाच वाजेपर्यंत बजावला नाही. मात्र सुदैवाची गोष्ट म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील मतदान हे अतिशय शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडलेला आहे. तर सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी ही काही वेळात समोर येईल.