Breaking News

पालघरच्या राजकारणात खळबळ! श्रीनिवास वनगांपाठोपाठ पाठोपाठ आणखी एक नेता नॉट रिचेबल

140 0

मागील काही दिवसांपासून पालघरच्या राजकारणात धक्क्यावर धक्के बदल असून शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीनिवास वनगा तिकीट न दिल्यामुळे दोन दिवस बेपत्ता झाले होते. त्यानंतर आता महायुतीतील आणखी एक बडा नेता नॉट रिचेबल झाला आहे.

माजी आमदार अमित घोडा हे बेपत्ता असल्याची माहिती समोर आली असून ते भाजपकडून इच्छुक होते. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी थेट अपक्ष म्हणून निवडणुकीत उडी घेतली.

यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. महायुतीच्या जागावाटपात ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाली होती. त्यांनी येथून माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी दिली.

अमित घोडा यांना मागील निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. या निवडणुकीत डहाणू किंवा पालघरमधून तिकीट मिळेल असं त्यांना वाटत होतं. मात्र ऐनवेळी राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अमित घोडांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!