भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत आज राजधानी नवी दिल्लीत बैठक होणार असून या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन आणि राज्याचे उच्चतंत्र शिक्षण सांस्कृतिक आणि वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील दिल्लीला झाले आहेत.
या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि प्रचार रणनीती ठरवण्याची शक्यता असून उद्या मुंबईमध्ये महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.
पत्रकार परिषदेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती महायुतीचे समन्वयक विधानपरिषद आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये असणाऱ्या एमसीए सभागृहात संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार असून या पत्रकार परिषदेत माहितीच्या नेत्यांकडून जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.