राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांची नोंद झाली असून यामध्ये 100 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या 47 हजार 392 मतदारांची नोंद झाली आहे.
राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक मतदार हे पुणे जिल्ह्यात तर सर्वात कमी मतदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंदवले गेले.
राज्यात कोणत्या वयोगटातील किती मतदार? (मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार)
18 ते 19 वर्ष: 22 लाख 22 हजार 407
20 ते 29 वर्ष: 1 कोटी 88 लाख 45 हजार पाच
30 ते 39 वर्ष: 2 कोटी 18 लाख 15 हजार 278
40 ते 49 वर्ष: 2 कोटी 7 लाख 30 हजार 598
50 ते 59 वर्ष: 1 कोटी 56 लाख 10 हजार 794
60 ते 69 वर्ष: 9 लाख 18 हजार 520
70 ते 78 वर्ष: 53 लाख 52 हजार 832
80 ते 89 वर्ष: 20 लाख 33 हजार 958
90 ते 99 वर्ष: चार लाख 48 हजार 38
100 ते 109 वर्ष: 47 हजार 169
110 ते 119 वर्ष: 113
120 वर्षाहून अधिक वर्ष: 110
दरम्यान या सोबतच राज्यात सहा लाख 41 हजार 425 इतकी दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे..