एकाच दिवशी काँग्रेसला दोन धक्के, या दोन बड्या नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

163 0

सध्या दिवाळीची धामधुम सुरू असून विद्युत रोषणाई सह फटाक्यांचे आतषबाजी पाहायला मिळत आहे. यासोबतच राजकीय अताशुबाजी ही मोठ्या प्रमाणावर सुरू असून आज एकाच दिवशी काँग्रेस पक्षाला दोन मोठे धक्के बसले आहेत.

मुंबई उपनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

मुंबईमधील काँग्रेसने ते आर राजा यांनी काँग्रेस मधून भाजपात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील वसंतस्मृती कार्यालयात त्यांनी त्यांनी भाजपा प्रवेश केला.

आर राजा हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते होते सायन कोळीवाडा प्रभागातून संघातून पाच टर्म नगरसेवक होते. मागील 44 वर्षांपासून युवक काँग्रेस पासून ते काँग्रेस पक्षात सक्रिय होते.

तर जयश्री जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत  शिवसेनेत प्रवेश केला आहे. जयश्री जाधव या कोल्हापूर उत्तर च्या विद्यमान आमदार होत्या त्यांचे पती चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपाच्या सत्यजित कदम यांना पराभव करत त्यांनी विजय मिळवला होता.

Share This News
error: Content is protected !!