आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेने स्वबळाचा नारा दिला असून 225 ते 250 जागा लढण्याची तयारी केली आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नवनिर्माण यात्रा सुरू असून या यात्रेदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन उमेदवारांची घोषणा केली.
यामध्ये मुंबईतील शिवडी मतदार संघातून मनसे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांना तर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी मिळाली आहे.
उमेदवारी जाहीर होताच अनेक मनसैनिकांनी बाळा नांदगावकर यांचे जंगी स्वागत केलं त्यानंतर आता बाळा नांदगावकर यांचे एक फेसबुक पोस्ट चर्चेत आहे.
बाळा नांदगावकर यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
कसं? राज साहेब म्हणतील तसं.
काल पहिल्या श्रावणी सोमवारी पक्षाध्यक्ष मा. राजसाहेब यांनी माझी शिवडी विधानसभा येथून उमेदवारी जाहीर केली. त्याबद्दल राज साहेब, शर्मिला वहिनी , अमित ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीय यांचे मनापासून आभार.
मला अनेक पत्रकार बंधू कायम विचारतात की तुम्ही लोकसभा का नाही लढली, विधानसभा लढणार का नाही लढणार? स्वबळावर लढणार का युती करून लढणार? आज मी या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर देतो.
कसं, राजसाहेब म्हणतील तसं. हे सोप्प सूत्र मी माझ्या जीवनात पाळत आलो आहे. साहेबांनी सांगितले लढ तर समोर कोणीही असो मी लढणार. साहेबांनी सांगितले थांब तर समोर कितीही मोठी संधी असेल तर मी थांबणार.
एकूणच काय साहेबांना निष्ठा अर्पण केल्यामुळे राजसाहेब म्हणतील तसचं मी करणार आणि साहेबांनी दाखवलेल्या “राजमार्ग” वर वाटचाल करणार असं नांदगावकरांनी फेसबुक पोस्ट मध्ये लिहिला आहे.