महाविकास आघाडी भक्कम आहे तोपर्यंत या सरकारला कोणताही धोका नाही. – जयंत पाटील

321 0

काल घोषित झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालाबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. शेवटी विजय हा विजयच असतो, त्यामुळे ज्यांचा पराजय झाला त्यांनी काहीही कारणं सांगितली तरी त्याचा फारसा उपयोग नाही. मात्र उत्तर प्रदेशमध्ये जर सर्व विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली असती, तर आजचे हे चित्र कदाचित दिसले नसते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपच्या हातातूनही काही राज्यं गेली आहेत. त्यामुळे एखादं मोठं राज्य जिंकलं म्हणून महाराष्ट्रातलं सरकार देखील पडेल, हे काही शक्य नाही. महाराष्ट्राची मानसिकता वेगळी आहे. सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस ही आघाडी जोपर्यंत भक्कम आहे तोपर्यंत या सरकारला कोणताही धोका नाही. तसेच मुंबई महापालिका शिवसेनेच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्यारीतीने काम करत आहे. त्यामुळे भाजपकडून फक्त वातावरण निर्मिती करण्याचा प्रकार होत आहे, असे त्यांनी सांगितले.

सध्या केंद्रीय तपास यंत्रणाकडून सुरू असलेल्या धाड सत्रावर ते म्हणाले की, भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करायला कोणाचाही विरोध नाही परंतु असे भ्रष्टाचारी फक्त भाजप सोडून इतर पक्षातच आहेत का ? त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांनी जरा त्यांच्याकडेही लक्ष द्यावं, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

Share This News

Related Post

eknath shinde

मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, राजभवनावर केले इमर्जन्सी लँडिंग

Posted by - May 13, 2023 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांचे राजभवनावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड होण्याची…

#CRIME : पत्नीला अद्दल घडवण्यासाठी तिच्या आईने दिलेल्या 44 लाखांची करवली चोरी; असा झाला उलगडा, मुंबईतील विचित्र घटना

Posted by - February 25, 2023 0
मुंबई : मुंबईच्या अंधेरी भागातून एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे 22 फेब्रुवारी रोजी भुलेश्वरला गेले…

ससून ड्रग्स प्रकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे 9 पोलीस निलंबित

Posted by - October 3, 2023 0
ड्रग्ज माफिया ललित पाटीलने पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आता या प्रकरणी नऊ पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय याप्रकरणी पीएसआय…
Dead

बहिणीला भेटण्यासाठी निघाला मात्र तिकडे पोहोचण्यापूर्वीच तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 4, 2023 0
परभणी : परभणी (Parbhani) जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये बहिणीला भेटण्यासाठी निघालेल्या तरुणाचा उष्माघाताने (heatstroke) मृत्यू (Dead)…
Accident News

Accident News : मुंबई अहमदाबाद हायवेवर टँकरने पोलीस व्हॅनला चिरडलं

Posted by - February 28, 2024 0
मुंबई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुपारी दोन वाजताच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात (Accident News) झाला. या अपघातामध्ये एका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *