PRAKASH AMBEDKAR ON PAHALGAMPRAKASH AMBEDKAR ON PAHALGAM

PRAKASH AMBEDKAR ON PAHALGAM l युद्धासाठी सैन्य तयार ; सरकारनेच कच खायला नको

735 0

PRAKASH AMBEDKAR ON PAHALGAM मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्य कारवाईसाठी सज्ज आहे. आता केंद्रसरकारने कच खायला नको, अशी कणखर भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (PRAKASH AMBEDKAR ON PAHALGAM )यांनी मांडली आहे.

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे शुक्रवारी मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी आंबेडकर बोलत होते.

https://www.youtube.com/live/HRzpjd4WbdU?si=ChFxehpPVEzVCA-F

ते म्हणाले की, सैनिकी कारवाईसाठी भारतीय सेना तयार आहे. मात्र, आपले राजकीय नेतृत्वच कुठेतरी कच खात आहे. जर मी नरेंद्र मोदी यांच्या जागी असतो, तर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची युद्धनीती अवलंबली असती. पाकिस्तानविरुद्ध केंद्रसरकारने थेट सैनिकी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यासंदर्भात त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाचा संदर्भ दिला. रशियाने गेल्या २ वर्षात युक्रेनच्या पायाभूत सुविधा उध्वस्त केल्या आहेत. युद्ध थांबल्यावर युक्रेनने नाटोकडे धाव घेतली तरीही त्याचा धोका रशियाला राहणार नाही. मोदी यांच्या जागी मी असतो तर हेच केले असते, असेही त्यांनी म्हटले.

पहलगाम दहशतवादी हल्ला हा आपल्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे. आपल्याला अजूनही हल्लेखोर सापडले नाहीत. ते कुठून आले, याची माहिती नाही. हल्ला झाल्यावर दहशतवादी नियंत्रण रेषा पार करून गेले आहेत. त्यामुळे आता थेट सैन्याला आदेश देऊन थेट सैनिकी कारवाई करण्याची गरज असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

VBA LOSS MVA: वंचित बहुजन आघाडीमुळे मराठवाडा आणि विदर्भात महाविकास आघाडीला धक्का; वंचितमुळे तब्बल ‘इतक्या’ मतदारसंघात झाला पराभव

Top News विशेष! Valmik Karad चा धाक, Parli ची ‘राख :’राखे’च्या ढिगाऱ्यावर उभा ‘वाल्या’च्या गुन्ह्यांचा डोलारा!

Exclusive Report : महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणाऱ्या ‘त्या’ शपथविधीला तीन वर्षे पूर्ण

Mumbai News : पणन महासंघाने प्राप्त उद्दिष्टानुसार खतसाठ्याची उचल केल्यानंतर आवश्यकता असल्यास कृषी विभागाने अतिरिक्त साठा मंजूर करावा

PAHALGAMच्या पीडित कुटुंबीयांना 50 लाखांची आर्थिक मदत ; STATE CABINETचा निर्णय

MAHARASHTRA GOVERMENT: 100 दिवस कार्यक्रमात 78 टक्के उद्दिष्ट्ये पूर्ण – मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: काका आता तरी थांबा VS अरे मी काय म्हातारा झालोय का; पुतण्याच्या लढाईत कोण जिंकणार ?

Maharashtra Political Crises : “अब सभी को सभी से खतरा है…!” संजय राऊतांचे ‘ते’ ट्विट चर्चेत

Maharashtra Politics : राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या नांदेडला यंदा मंत्रीपदाचा भोपळा

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide