नवी दिल्ली: हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक केव्हा होणार या प्रश्नाचे उत्तर आज अखेर मिळणार असून आज दुपारी साडेतीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद प्लॅनरी हॉल विज्ञान भवन नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे.
महाराष्ट्राबरोबरच झारखंड विधानसभेच्या निवडणुकीची घोषणाही आज होणार आहे.