राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळत आहेत. नुकतीच भाजपाकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे तर आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीनं 83 तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 9 उमेदवारांची घोषणा केली आहे.
तर महाविकास उमेदवारांची घोषणा अद्याप बाकी असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षानं चार उमेदवारांची घोषणा केली आहे.
उरण,पनवेल,अलिबाग, पेण-सुधागड या चार विधानसभा मतदार संघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.
कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी?
- पेण-सुधागड अतुल म्हात्रे
- अलिबाग चित्रालेखा पाटील
- पनवेल बलराम पाटील
- उरण प्रीतम म्हात्रे