अमरावती : अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Kaur Rana) या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. भाजपाध्यक्ष जेपी नड्डा हे नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. 4 एप्रिलला नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. नवनीत राणा या आपल्याला भाजपानं पाठिंबा द्यावा यासाठी आग्रही होत्या, मात्र त्या आता चार एप्रिलला जेपी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश करणार आहेत.
कमळ चिन्हावर लढवणार निवडणूक?
सुरुवातीला भाजपानं आपल्याला पाठिंबा द्यावा असा नवनीत राणा यांचा आग्रह होता. मात्र आता नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. याचवेळी नवनीत राणा या नागपूरमध्ये नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता अमरावती लोकसभा निवडणूक नवनीत राणा या कमळ चिन्हावर लढवण्याची शक्यता आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Bengaluru Cafe Blast : बंगळुरू हादरलं ! कॅफेमध्ये भीषण स्फोट; 4 जण जखमी
Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधात जयश्री पाटलांकडून हायकोर्टात याचिका दाखल
Buldhana News : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांवर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली ‘ही’ नवी मागणी
Loksabha Election 2024: ‘मविआ’च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर
Car Accident : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात
Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
Setu Bandha Sarvangasana : सेतुबंधासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?