Ambadas Danve

Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाने चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर दानवेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

534 0

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात (Ambadas Danve) आली आहे. यामध्ये 17 जणांच्या नावाचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता अंबादास दानवे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे?
‘मी शिवसैनिक आहे, मला पक्षाचं हित कळतं, संघटनेचं हित कळतं. जर पक्षाचं चांगलं झालं तर माझंही भलं होणार आहे. त्यामुळे माझ्यावर जी जबाबदारी सोपवली जाणार तीला योग्य पद्धतीनं न्याय देण्याचं काम मी करणार आहे. जो उमेदवार दिला आहे, त्याला मोठ्या मताधिक्यानं विजयी करायचं आहे. चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मीच पक्षप्रमुखांना फोन केला. मी नाराज नसल्याचं त्यांना सांगितलं. शिवसेनेत मोठी फूट पडली, अनेक लोक शिवसेनेला सोडून गेले, या धक्क्यातून सावरत असताना पक्षानं दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पडणं हे आपलं काम असल्याचं’ दानवे यांनी म्हटलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vanchit Bahujan Aaghadi : महाविकास आघाडीला मोठा धक्का ! वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

Sadanand Date : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या डायरेक्टर जनरलपदी सदानंद दाते यांची नियुक्ती

Maharashtra Weather Update : राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Loksabha Election : ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर! 16 शिलेदारांच्या नावाची केली घोषणा

Share This News
error: Content is protected !!