आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

शेतकऱ्यांना गांजा पिकविण्याची परवानगी द्या ; हतबल शेतकऱ्याचा मुख्यमंत्र्यांना ई-मेल

शेतकऱ्यांना आपल्या शेतात गांजा पिकविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नांदेडच्या शेतकऱ्यांनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

अविनाश अनेराये असं या ई मेल पाठवणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव असून संबंधीत शेतकरी नांदेड येथील नायगाव तालुक्यातील शेळगांव याठिकाणी राहत आहे.

कोरोना,अतिवृष्टी यामुळं आर्थिक उत्पन्न घटलं असून त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केल्याचे या शेतकऱ्याने सांगितलंय.