ALL ASSEMBLY SPEAKER: दिलीप वळसे पाटील, नाना पटोले ते राहुल नार्वेकर; कोण झालं आहे विधानसभेचे अध्यक्ष?

235 0

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची फेरनिवड झाली असून बाळासाहेब भारदे यांच्यानंतर सलग दुसऱ्यांना विधानसभा अध्यक्ष होणारे राहुल नार्वेकर हे दुसरे विधानसभाध्यक्ष ठरले आहेत याअगोदर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून कोणी पदभार सांभाळला आहे यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट..

महाराष्ट्र राज्य स्थापनेपूर्वी मुंबई राज्य असताना 1937 ते 1956 पर्यंत महाराष्ट्र विधानसभेला तीन अध्यक्ष मिळाले आहेत.
गणेश माळवतकर यांनी 1937 ते 1946 पर्यंत विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. त्यानंतर कुंदनमल फिरोदिया यांनी 1946 ते 1952 पर्यंत आणि दत्तात्रय कुंटे यांनी 1952 ते 1956 पर्यंत विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे.
त्यानंतर द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आल्यानंतर 1956 ते 1960 पर्यंत सयाजी सीलम यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे.
यानंतर एक मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर सयाजी सीलम यांनी यांनी 1960 ते 1962 त्यानंतर त्र्यंबक उर्फ बाळासाहेब भारदे यांनी 1962 ते 1967 आणि 1967 ते 1972 या कार्यकाळात विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. शेषराव वानखेडे यांनी 1972 ते 1977 तर दौलतराव उर्फ बाळासाहेब देसाई यांनी 4 जुलै 1977 ते 13 मार्च 1978 पर्यंत विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. त्यानंतर शिवराज पाटील यांनी 17 मार्च 1978 ते 6 डिसेंबर 1979 पर्यंत विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. पुढे प्राणलाल व्होरा यांनी 01 फेब्रुवारी 1980 ते 26 जून 1980 पर्यंत महाराष्ट्र विधानसभेचं अध्यक्ष पद भूषवलं आहे. व्होरा यांच्यानंतर शंकर दिघे यांनी 1980 ते 1985 त्यानंतर शंकरराव जगताप यांनी 1985 ते 1990 आणि मधुकरराव चौधरी यांनी 1990 ते 1995 या कार्यकाळात महाराष्ट्र विधानसभेचं अध्यक्ष पद भूषवलं आहे. पुढे राज्यात शिवसेना-भाजपाचं युती सरकार सत्तेत आल्यानंतर दत्ताजी नलावडे यांनी 1995 ते 1999 पर्यंत विधानसभेचं अध्यक्षपद सांभाळलं आहे. 1999 ते 2004 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अरुण लाल गुजराथी यांनी विधानसभा अध्यक्षपद सांभाळलं. त्यानंतर कृष्णराव उर्फ बाळासाहेब कुपेकर यांनी 2004 ते 2009 दिलीप वळसे पाटील यांनी 2009 ते 2014 यांनी कार्यकाळात विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकार सत्तेत आल्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी 2014 ते 2019 या कार्यकाळात अध्यक्षपद सांभाळलं त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाना पटोले यांनी 2019 ते 2021 पर्यंत विधानसभेचे अध्यक्ष पद सांभाळलं आहे. त्यानंतर नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 2022 ते 2024 या कार्यकाळात राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यानंतर आता पुन्हा विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांचीच वर्णी लागली आहे.

RAHUL NARVEKAR| विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड

Share This News
error: Content is protected !!