Ajit pawar and jitendra Awhad

VIDEO: ‘अजित पवारांची दादागिरी नही चलेगी’; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या अशोक पवारांच्या व्हिडिओमुळे राजकारणात वादळ

159 0

राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यापासून सर्वच पक्ष आणि वरिष्ठ नेते आपापल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत असताना दिसत आहेत. उमेदवार आणि नेत्यांकडून निवडणुका जिंकण्यासाठी जयत तयारी करण्यात आली आहे. यातच आता उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभेचे उमेदवार अजित पवार यांचा एक धक्कादायक व्हिडिओ शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केला आहे. या व्हिडिओत अजित पवार हे आपल्या उमेदवाराला मत देण्यासाठी समोर बसलेल्या व्यक्तींबरोबर संभाषण करताना दिसत आहेत. हाच व्हिडिओ शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

व्हिडिओत नेमकं काय ?

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये ‘अजित पवारांची दादागिरी नही चलेगी, नही चलेगी’, असं कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर हा व्हिडिओ ‘श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कारखान्यातील असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार हे लोकांशी संभाषण करत आहेत.

अजित पवार : मला तुमची साथ हवी आहे. कुणाच्या दबावाला घाबरायची गरज नाही. आधी रामराजे यांचं ऐकलं आता माझं ऐकावं अशी विनंती आहे. इथ जरी कुणाचही युनिट असलं तरी पुढं चालवायचं की नाय चालवायचं ह्याबाबत मी बरंच काही करू शकतो… बोला, दबाव आहे का तुमच्यावर?

कामगार: तुमच्या सहकार्याने आणि मदतीने बंद असलेला साखर कारखाना त्यांनी सूरू केला.

अजित पवार: हे साफ चुकीचं आहे. धारुला नीट विचारा कुणी काय मदत केली ते. तिकडं सगळी सुत्र आम्ही हलवली. मला बरंच काही करता आलं असतं. कुणी म्हणत होतं धारूने नाही अजित पवारने कारखाना घेतला. शेजारी असणारा शरयू कारखाना माझ्या बंधूने घेतला…… त्यावेळीं ह्या कारखान्याबाबत माझ्याकडे सुद्धा ऑफर आली होती. त्यावेळीं सगळं काही झालं होतं परंतु माझ्या माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याच याच परिसरात युनिट असल्यामुळे मी काही केलं नाहीं . परंतु आता मी जर काही गंमत करायची ठरवली तर खूप काही करू शकतो. परत तुम्ही रडत माझ्याकडे याल… चूक झाली आमचा गैरसमज झाला म्हणुन…. मी एकतर कुणाच्या नादाला लागत नाही तुम्हाला कुणालातरी मतदान करायचं आहे.
कदाचित तुम्हाला काही वाटत असेल तर ठिक आहे. मला तर माझी जागा निवडून आणायची आहे. त्यासाठी जिवाचं रान करायचं आहे. परंतु नंतर अशी वेळ येईल की त्यावेळीं तुमच्या डोळ्यात पाणी येईल तुम्ही काहीच करू शकणार नाही. मग मी धारूच सुद्धा ऐकणार नाही.

व्हिडिओ खरा की खोटा ?

जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मात्र हा व्हिडिओ खरा की खोटा ? या व्हिडिओत किती तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळेच हे नेमकं प्रकरण काय आहे आणि यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देता याकडे आता सर्वांचच लक्ष लागलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!