उपमुख्यमंत्री अजित पवार(AJIT PAWAR) यांच्या विमान अपघाताची चौकशी केवळ तांत्रिक पातळीवर न होता ती तटस्थपणे व्हायला हवी, अशी मागणी खासदार संजय राऊत(SANJAY RAUT) यांनी केली आहे. हा विषय अत्यंत रहस्यमय आणि राजकीय असल्याचा दावा करत त्यांनी या घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
संजय राऊत(SANJAY RAUT) म्हणाले की, जे विमान आदल्या दिवशी गुजरातच्या सूरतमध्ये (SURAT) होते, तेच विमान दुसऱ्या दिवशी अजित पवारांना (AJIT PAWAR) जाण्यासाठी बारामतीत(BARAMATI) येते आणि अचानक कोसळते, हा योगायोग नसून संशयास्पद आहे. यामागे नक्की काय गौडबंगाल आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे.
यावेळी राऊत यांनी विदर्भातील एका नेत्यावरही निशाणा साधला. अजित पवारांचा गाडीने जाण्याचा प्लॅन असताना त्यांना मुद्दाम उशिरापर्यंत कोणी थांबवून ठेवले का? असा सवाल त्यांनी केला. तो नेता भाजपचा (BJP) आहे की राष्ट्रवादीचा (NCP)? कोणत्या फाईलवर सही करण्यासाठी एवढी घाई करण्यात आली? या सर्व गोष्टींची चौकशी झालीच पाहिजे, असे राऊत यांनी ठामपणे मांडले.
सुनेत्रा पवार (SUNETRA PAWAR) आणि पार्थ पवार (PARTH PAWAR)हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. सकाळपासून त्यांना भेटायला कोणी नेता गेला नाही, त्यामुळे त्यांना प्रफुल्ल पटेल (PRAFULLA PATEL) यांच्या घरी नाष्ट्यासाठी जावे लागले. यावर संजय राऊत म्हणाले, “याबद्दल मी काय सांगणार ?” ते सत्तेतल्या पक्षाचे आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. हा पक्षांतर्गत विषय आहे. पक्षामध्ये सर्वकाही ठीक नाही ,एवढेच मी म्हणेन. असे संजय राऊत (SANJAY RAUT) म्हणाले.