आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी अजित पवार

एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीला आता विरोधी बाकावर बसावे लागले आहे. राष्ट्रवादीमधून विरोधी पक्षनेतेपदी कुणाची निवड होणार अशी चर्चा रंगली होती. अखेरीस आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.

आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांची निवड झाली आहे. आज विधान भवनात राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. आज सभागृहात विधानसभा विरोधी पक्षनेतेच्या नावावर अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.